चटकदार लोणच्याचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. एप्रिल मे महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वच घरांमध्ये वाळवणाचे पदार्थ बनवायला सुरुवात केली जाते. त्यामध्ये लोणचं, पापड, कुरडया, सांडगे इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. लोणच्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवली जातात. त्यामध्ये कैरीचे लोणचं, लिंबाचे लोणचं, मिरचीचे लोणचं, करवंदाचे लोणचं इत्यादी अनेक प्रकारची लोणची बनवली जातात. पण आज आम्ही तुम्हाला कैरी कांद्याचे चविष्ट आंबटगोड लोणचं बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हे लोणचं बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटांमध्ये तुम्ही कैरी कांद्याचे लोणचं बनवू शकता. चला तर जाणून घेऊया लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)


उन्हाळा होईल सुखकर! अस्सल राजस्थानी पद्धतीमध्ये घरी बनवा ‘मारवाडी कुल्फी’, नोट करून घ्या रेसिपी


साहित्य:



  • कैरी

  • कांदा

  • तेल

  • मीठ

  • मोहरीची डाळ

  • हिरवी मिरची

  • बडीशेप

  • कांद्याच्या बिया

  • हिंग

  • लाल तिखट

  • कोथिंबीर


उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये प्या पुदिन्याच्या पानांचे थंडगार सरबत, ‘या’ पद्धतीने तयार केलेली पावडर वर्षभर राहील टिकून


कृती:



  • कैरी कांद्याचे चविष्ट लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांद्याची साल काढून उभा कांदा चिरून घ्या. यासोबतच कैरीचे सुद्धा मध्यम आकाराचे तुकडे करा.

  • कढई गरम करून त्यात बडीशेप भाजा. त्यानंतर त्यामध्ये कांद्याच्या बिया भाजून घ्या. हे पदार्थ भाजताना तेल किंवा पाणी काहीच घालू नये.

  • मिक्सरच्या भांड्यात थंड झालेल्या कांद्याच्या बिया बारीक वाटून पावडर करा.

  • मोठ्या टोपात बारीक कापून घेतलेला कांदा, किसून घेतलेली कच्ची कैरी, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि बडीशेप, कांद्याच्या बियांची पावडर घालून मिक्स करून घ्या.

  • सगळ्याच्या शेवटी लोणचं बनवताना त्यात चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या.

  • फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरीचे दाणे आणि हिंग घालून १ मिनिट भाजून घ्या. गॅस बंद करून तयार केलेली फोडणी कांद्याच्या मिश्रणात ओता.

  • तयार केलेले लोणचं मिक्स करून काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. २ दिवसांनंतर लोणचं व्यवस्थित मुरले जाईल.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.